पोस्ट्स

नोव्हेंबर, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

Quote of the day 1

इमेज
#Quote_of_the_day       जराशी तणतणत अनुजा तिच्या डेस्कवर येऊन बसली. आज मीटिंगमध्ये पुन्हा बॉसशी वाजलं होतं. तसा अनुजाचा मुद्दा बरोबर होता पण बोलताना जीभ घसरली अन् पुढचं रामायण घडलं. थोडं पाणी पीत तिने तिच्यासमोर असणाऱ्या कम्प्युटर वर आवडतं ब्लॉग पेज ओपन केलं. कामाच्या ठिकाणी हे करणं खर तर योग्य नसतं पण ते ब्लॉग पेज त्यांच्याच कम्पनीने डिझाइन केलेलं होत आणि आता ते बऱ्यापैकी पॉप्युलर असल्याने नवीन प्रोजेक्ट वेळी त्याचा उल्लेख नक्कीच व्हायचा.  असो. तर बघूया तरी आज काय नवीन आहे म्हणून अनुजाने ब्लॉग ओपन केला होता.  तिच्या समोर नवीन quote म्हणजेच सुविचार आला आणि तिचं विचारचक्र सुरू झालं.  “You can give a person knowledge but you can't make them think. "  खरंय न नकळतच अनुजा पुटपुटली. काही लोकांना बदल करावा लागेल म्हणून सत्य नाकारणं किती सोयीचं वाटतं. पण त्याचा तोटा काय होईल हा विचार करत नसतील का अशी लोकं? स्वतःचे विचार थोडे बाजूला सारून ती पुढे वाचू लागली.  पुढे लिहिलं होतं, असं अनेक लोक वागतात अगदी पावलोपावली आपली त्यांच्याशी गाठ पडते. ही लोकं  खोटया किंवा चुकीच्या बाजून